पंतप्रधान शुक्रवारी (12 जानेवारी 2024) रोजी नरेंद्र मोदी नाशिक आणि नवी मुंबई दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधानाच्या हस्ते शिवडी - न्वाहाशेवा या सागरी सेतूचे लोकार्पण होईल. पंतप्रधानांचे सकाळी 11 वाजण्याच्या सुमाराला नाशिक येथे आगमन होईल. नाशिकमध्ये 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. 17,800 कोटी खर्चून उभारला अटल सेतू 2016 साली मोदींनीच पुलाचं भूमिपूजन केलं होतं. 2000 कोटींच्या रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन, खारकोपर ते उरण रेल्वेसेवेचं मोदींकडून उद्घाटन होणार.
पंतप्रधान दुपारी 3:30 च्या सुमाराला, मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी - न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन करणार असून प्रवाससुद्धा करणार आहेत. नवी मुंबई येथे दुपारी 4:15 च्या सुमारास, पंतप्रधान एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. तेथे अटल सेतूचे लोकार्पण तसेच पूर्वमुक्त मार्गाला जोडणाऱ्या ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह भुयारी मार्ग, उरण-खारकोपर रेल्वे आदी प्रकल्पांचे भूमिपूजन करतील. 'नमो महिला सशक्तीकरण' अभियानाची सुरुवात मोदी यांच्या उपस्थितीत होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी राज्यातील 30,500 कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन, उद्घाटन करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमासाठी अनेक नागरिक, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. तसेच नवी मुंबईतील पोलिसांच्या मदतीसाठी मुंबई आणि ठाण्यातील पोलीस पथक सुद्धा दाखल होणार आहेत.