पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi ) आज देहूत (dehu) येणार आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या (tukaram maharaj) शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळयासाठी पंतप्रधानांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. मोदी यांच्या दौऱ्याची प्रशासकीय पातळीवरील तयारी करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या सर्व बाबींची कसून तपासणी केली जात आहे. मंदिर परिसरात मोठा सभामंडप उभारण्यात आला आहे. या दौऱ्यामुळे वारकरी संप्रदायात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
२० जूनला तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे (pandharpur) प्रस्थान होणार असून, त्यापूर्वी लोकार्पणाचा सोहळा होत आहे. मोदींचे समारंभात संत तुकाराम महाराज पगडीने स्वागत करण्यात येणार आहे.
कसा असणार मोदींचा प्रवास
पंतप्रधान मोदी हे दोन तास देहू परिसरात असणार आहेत. दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी त्यांचे लोहगाव विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर विमानतळावरून देहूकडे ते प्रयाण करतील. एक वाजून ४५ मिनिटांनी मंदिर समिती जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर संस्था परिसरात ते दाखल होतील. या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा २० मिनिटांचा लोकार्पण सोहळा होईल. दोन वाजून दहा मिनिटांनी ते सभेच्या ठिकाणी दाखल होतील. या ठिकाणी ५० मिनिटांची सभा होणार असून सभामंडपात वारकरी, उपस्थित भाविकांशी ते संवाद साधणार आहेत. येत्या २० जूनपासून श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळय़ास सुरुवात होणार आहे.
मोदींची पगडी ही ‘भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी’, हा बुक्क्याने लिहिलेला अभंग, तुळशीच्या मण्यांनी केलेली बांधणी, टाळ, चिपळय़ा अशा वारकरी संप्रदायाच्या प्रतीकांचा वापर बनवण्यात आली आहे.