पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 डिसेंबर म्हणजेच आज जगातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट ऑफिस हब 'सूरत डायमंड बोर्स' चे उद्घाटन करणार आहेत. PM मोदी सुरत डायमंड बोर्स आणि सुरत विमानतळावरील नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करतील. आज 17 डिसेंबर रोजी सकाळी 10.45 वाजता सूरत विमानतळावरील इंटीग्रेटेड टर्मिनल बिल्डिंगचे उद्घाटन करतील. तसेच सकाळी 11.15 वाजता सुरत डायमंड बोर्सचं उद्घाटन करतील. 3400 कोटी रुपये खर्चून 35.54 एकर जमिनीवर बांधलेले, सूरत डायमंड बाजार आणि पॉलिश्ड हिऱ्यांच्या व्यापारासाठी जागतिक केंद्र बनणार आहे.
खरं तर, सुरत डायमंड बोर्स हे आंतरराष्ट्रीय हिरे आणि दागिन्यांच्या व्यापारासाठी जगातील सर्वात मोठे आणि आधुनिक केंद्र असेल. एक्स्चेंजमध्ये आयात-निर्यातीसाठी अत्याधुनिक 'कस्टम क्लिअरन्स हाऊस' आहे. यामध्ये ज्वेलरी मॉल, आंतरराष्ट्रीय बँकिंग आणि रिटेल ज्वेलरी व्यवसायासाठी सुरक्षित तिजोरीची सुविधा असेल. सूरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्यानं बांधलेल्या इंटीग्रेटेड टर्मिनल बिल्डिंगची रचना पीक अवर्सच्या वेळी 1200 डोमेस्टिक आणि 600 आंतरराष्ट्रीय प्रवाशांना एकाच वेळी हाताळण्यासाठी करण्यात आली आहे.
तसेच, या रचनेमुळे इमारतीची वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता 55 लाखांपर्यंत वाढली आहे. सूरत विमानतळाची नवीन टर्मिनल इमारत GRIHA IV मॉडेल अंतर्गत बांधण्यात आली आहे. ही दुहेरी इन्सुलेटेड रूफिंग सिस्टीम, ऊर्जा बचतीसाठी छत, कमी उष्णता वाढवणारे डबल ग्लेझिंग युनिट, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, सीवेज ट्रीटमेंट प्लांट आणि सोलार पॉवर प्लांट यांसारख्या सुविधांनी सुसज्ज आहे.
डायमंड सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरतसाठी ही मोठी भेट आहे. सुरतनंतर पंतप्रधान मोदी आज 17 डिसेंबर रोजी वाराणसीला रवाना होतील. तेथे ते संध्याकाळी 5:15 वाजता ते नमो घाट येथे काशी तमिळ संगम 2023 चे उद्घाटन करतील. यानंतर पंतप्रधान मोदी 18 डिसेंबर रोजी सकाळी वाराणसीतील स्वर्वेद महामंदिराला भेट देतील, त्यानंतर ते सार्वजनिक कार्यक्रमात उद्घाटन करतील. यानंतर, पंतप्रधान मोदी सार्वजनिक कार्यक्रमात 19150 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील.