मुंबईत आपल्या हक्काचं घर घेण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र, प्रत्येकालाच मुंबईत घर घेणं परवडतच असं नाही. कारण मुंबईत घरांची किंमत दिवसेंदिवस वाढतच आहे. तरीही मुंबईत घरांची विक्री होत आहे. घरांच्या विक्री विषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
मुंबईत विकली गेलेली 70 % घरे 1 ते 5 कोटीं रुपयांच्या किमतीदरम्यान असल्याची माहिती पुढे आली आहे. बांधकाम क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या एका सर्वेक्षण संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे ही माहिती मिळाली आहे.
चालू वर्षात आतापर्यंत सव्वा लाख घरांच्या विक्रीचा टप्पा पार केलेल्या मुंबईत झालेल्या या घर विक्रीमधील किमान ७० टक्के घरे ही एक ते पाच कोटी रुपयांच्या किमतीदरम्यान असल्याची माहिती पुढे आली आहे. बांधकाम क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या एका सर्वेक्षण संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे ही माहिती मिळाली आहे. ज्या घरांची विक्री झाली आहे त्यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे २ बीएचके, तीन बीएच के, चार बीएच के फ्लॅटचे आहे. तसेच, या घरांची विक्री प्रामुख्याने मध्य मुंबई आणि पश्चिम उपनगरांत झाली आहे.
पश्चिम उपनगरांत देखील वांद्रे, अंधेरी, वर्सोवा, ओशिवरा, खारपासून मालाड ते कांदिवलीपर्यंत ही विक्री झाली आहे. मुंबईत जी पायाभूत सुविधांची विकास कामे सुरू होती त्यापैकी पश्चिम उपनगरांतील बहुतांश प्रकल्प पूर्ण होऊन कार्यान्वित झाले आहे. त्यामुळे आजच्या घडीला पूर्व उपनगरांच्या तुलनेत पश्चिम उपनगरांतील घरांना मोठी मागणी आहे.
दरम्यान, गेल्या पाच महिन्यांत मुंबई शहरात १०० कोटी रुपये आणि त्यावरील किमतीच्या चार घरांची विक्री झाली आहे. त्यामध्ये मलबार हिलमध्ये दोन फ्लॅट विकले गेले आहेत. यापैकी एका घराची किंमत २५२ कोटी तर दुसऱ्या घराची किंमत १८० कोटी रुपये इतकी आहे तर वरळी येथे अलीकडेच एका घराची विक्री किंमत १९८ कोटी रुपयांना झाली आहे. तर महालक्ष्मी येथे एका घराची विक्री १०४ कोटी रुपयांना झाली आहे.