Presidential Elections of India 2022 Team Lokshahi
ताज्या बातम्या

भाजपनं मुर्मूंसाठी ताकद पनाला लावली, तर विरोधकांमध्ये सगळीकडेच फूट पडली

Presidential Elections of India 2022 : काँग्रेस, राष्ट्रवादी, सपा पक्षाच्या लोकांनी क्रॉस वोटींग केल्याचा आरोप.

Published by : Sudhir Kakde

Presidential Elections of India 2022 : संसद आणि देशातील सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. एकीकडे एनडीएने या निवडणुकीत आपली ताकद दाखवली. तर दुसरीकडे विरोधी पक्षांना क्रॉस वोटिंगला सामोरं जावं लागलं आहे. गुजरातपासून यूपीपर्यंत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि सपा या पक्षांमध्ये फूट पडल्याचं पाहायला मिळालं. गुजरात कंधलमधील राष्ट्रवादीचे आमदार एस. जडेजा यांनी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन NDA उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूनं मतदान केलं. ते पक्षविरोधी भूमिका घेतील, अशी भीती त्यांच्या मनात आधीपासूनच होती. राष्ट्रवादीनं यशवंत सिन्हा यांना पाठिंबा जाहीर केला होता. याशिवाय झारखंडमधील राष्ट्रवादीचे आमदार कमलेश सिंह यांनीही द्रौपदी मुर्मूंच्या बाजूने मतदान केले. मतदान केल्यानंतर ते म्हणाले की, मी माझ्या विवेकाच्या आवाजावर द्रौपदी मुर्मूंच्या बाजूनं मतदान केलं आहे.

एवढंच नाही तर गुजरातमधील भारतीय आदिवासी पक्षाचे नेते छोटूभाई वसावा यांनीही द्रौपदी मुर्मू यांना मतदान केलं आहे. गरिबांच्या प्रगतीसाठी काम करणाऱ्या नेत्याला मी मतदान केल्याचं ते यावेळी म्हणाले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षातही फूट पडली आहे. एकीकडे अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव यांनी द्रौपदी मुर्मूंना मतदान केलं आहे. तर सपाचेच आमदार शाहजील इस्लाम यांनीही द्रौपदी मुर्मूच्या बाजूनं मतदान केलं आहे. बरेलीतील भोजीपुरा येथील पक्षाचे आमदार शाहजील इस्लाम हे काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याचं बोलले जात होतं.

एकेकाळी मुलायमसिंह यादव यांना आयएसआय एजंट म्हणणाऱ्या व्यक्तीला आपण मतदान करणार नसल्याचं शिवपाल यादव यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग रोखण्यात काँग्रेसलाही अपयश आलंय. पक्षाचे ओडिशातील आमदार मोहम्मद मुकीम यांनीही एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला मतदान केलं आहे. ओडिशा काँग्रेसमधील सूत्रांचं म्हणणं आहे की, मुकीम स्वतः प्रदेशाध्यक्ष पदाची अपेक्षा बाळगून होते. मात्र तसं न केल्यानं ते पक्षावर नाराज होते. झारखंडमध्येही काँग्रेस आमदारांच्या बाजूनं क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय