भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवणार आहेत. यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात सुमारे 1,800 व्यक्तींना 'विशेष पाहुणे' म्हणून समारंभास उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे. जय्यत तयारी या कार्यक्रमासाठी करण्यात आलेली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्ट दिवशी ऐतिहासिक वास्तूच्या तटबंदीवरून देशातील जनतेला संबोधित करतील. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आज (14 ऑगस्ट रोजी) राष्ट्राला संबोधित करणार आहेत.
स्वातंत्र्य दिनानिमित्त सरकारने आपल्या विविध योजनांसाठी 12 वेगवेगळ्या ठिकाणी सेल्फी पॉइंट्स उभारले आहेत. असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.