राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राजधानी दिल्लीतून देशाला संबोधित करणार आहेत. राजधानी दिल्लीतून आज संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषण सुरू होईल. आज राष्ट्रपती काय बोलणार? याकडे सर्व देशवासीयांचं लक्ष लागलं आहे.
संध्याकाळी 7 वाजल्यापासून राष्ट्रपतींचे भाषण प्रथम हिंदी आणि नंतर इंग्रजी भाषेत दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर आणि आकाशवाणीच्या (AIR) संपूर्ण राष्ट्रीय नेटवर्कवर प्रसारित केले जाईल. दूरदर्शनवर हिंदी आणि इंग्रजीमध्ये संबोधन प्रसारित केल्यानंतर, दूरदर्शनच्या प्रादेशिक वाहिन्यांद्वारे प्रादेशिक भाषांमध्ये देखील प्रसारित केले जाईल. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे अभिभाषण ऐकण्यासाठी देशवासियांनाही उत्सुकता आहे. कारण राष्ट्रपती पहिल्यांदाच त्यांचे अभिभाषण ऐकणार असून, राष्ट्रपती त्यांच्या अभिभाषणात कोणत्या विषयांचा समावेश करणार आहेत, याबाबत उत्सुकता आहे.