प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची ठाकरे गटाच्या शिवसेनेसोबत युतीसाठीच्या चर्चा रंगल्या आहेत. यातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात काल मध्यरात्री गुप्त बैठक झाली. तब्बल अडीच तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. महापालिका निवडणुका आणि विधान परिषदेत बहुजन समाजाची मते मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यामुळेच शिवसेनेनेही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची काल रात्री वर्षा निवासस्थानी ही बैठक झाली. चर्चेवेळी शिंदे आणि आंबेडकरच होते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, निवडणूक ही ठाकरेंसोबतच लढवणार आहे. एकनाथ शिंदे जुने शिवसैनिक आहेत. शिंदेंनी जर भाजपाची साथ सोडली तरच ही राजकीय चर्चा होऊ शकते. आणि जर शिंदेंनी भाजपाची साथ सोडली तर आम्ही विचार करु असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. पॅंथर सेनेचे नाते शिंदेंना चांगलेच माहित आहे. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
तसेच ठाकरेंसोबतच्या युतीत कोणताही बदल होणार नाही. भाजपासोबत युती करणार नाही. निवडणुका ठाकरेंसोबतच लढवणार आहे. भाजपासोबत असणाऱ्या पक्षांना कधीच पाठिंबा नाही. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.