ताज्या बातम्या

प्रकाश आंबेडकर यांनी घेतली लक्ष्मण हाकेंची भेट; ट्विट करत म्हणाले...

लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे.

Published by : Siddhi Naringrekar

लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. जालन्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके उपोषण करत आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहेत.

आज प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष्मण हाके यांची भेट घेतली आहे. ही भेट घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट केलं आहे. प्रकाश आंबेडकर ट्विट करत म्हणाले की, वडीगोद्री, जि. जालना येथे ओबीसी आरक्षण आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ पवार यांची भेट घेतली.

यासोबतच ते म्हणाले की, यावेळी आंदोलकांना विनंती केली की, आपण पाणी घ्यावे. आंदोलकांनी विनंतीला मान देऊन पाणी घेतले. आमची आधीपासूनच भूमिका आहे की, ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागता कामा नये. मराठा आरक्षणाचे ताट वेगळे आणि ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळे असावे. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश