ताज्या बातम्या

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांच्या तब्येतीत सुधारणा; पहिला व्हिडिओ आला समोर; म्हणाले...

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना पुढील 24 तास त्यांना अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून दोन दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना पुण्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

आता प्रकाश आंबेडकरांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ते म्हणाले की, मी सध्या आयसीयूमध्ये आहे. अँजिओप्लास्टी आणि अँन्जिओग्राफी दोन्ही झालेल्या आहेत. डॉक्टरांनी देखरेखीखाली ठेवलेलं आहे. निवडणुकांची सुरुवात झालेली आहे. ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. ओबीसींसाठीसुद्धा अत्यंत महत्वाची आहे कारण विधानसभेनंतर ओबीसीचे आरक्षण थांबवलं जाणार आहे आणि दुसऱ्या बाजूला एससीचं आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, विधानसभेमध्ये आमदार निवडून आले तर त्याठिकाणी आरक्षणावरचा हल्ला थांबवता येतो. म्हणून सर्व कार्यकर्त्यांना, उमेदवारांना, आरक्षणवादी जनतेला आव्हान करतो की, आपण वंचित बहुजन आघाडी म्हणजे गॅस सिलेंडर याच्या पाठिमागे उभे राहा आणि गॅस सिलेंडरवरतीच आपलं अमूल्य मत द्याल अशी अपेक्षा आहे. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Spinach Benefits For Women: महिलांसाठी पालक खाणं ठरेल फायद्याचे! कसे ते जाणून घ्या...

'फोर्स वन'चे 12 जवान फडणवीसांच्या सुरक्षेत तैनात

Blocking the convoy of the candidate who came for campaigning: प्रचारासाठी गावात आलेल्या उमेदवाराचा ताफा अडवल्याचा प्रकार

Diwali Rangoli Benefits: दाराबाहेर काढलेली रांगोळी किड्या-मुंग्यांवर कशी घालते आळा? जाणून घ्या

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर