ताज्या बातम्या

Ram Mandir Pranpratistha: प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा; कसा पार पडेल 'हा' सोहळा पाहाच...

अयोध्येत राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. आज होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येसह संपूर्ण देशभर रामभक्तीचे वातावरण आहे.

Published by : Team Lokshahi

अयोध्येत राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. आज होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येसह संपूर्ण देशभर रामभक्तीचे वातावरण आहे. अयोध्येतील घराघरांवर भगवे ध्वज, गुढ्या उभारण्यात आल्या आहेत. सोहळ्यासाठी अयोध्यानगरी एखाद्या नववधूप्रमाणे नटल्याचं चित्र आहे. सकाळी 10 वा. अयोध्येत मंगलध्वनीचे वादन, महाराष्ट्रातल्या 'सुंदरी' वाद्याचं वादन असेल. सकाळी 10.25 वा. पंतप्रधानांचे अयोध्या एअरपोर्टवर आगमन होईल. सकाळी 10.55 वा. पंतप्रधानांचे राम जन्मभूमी परिसरात आगमन होईल. दुपारी 12.15 ते 12.45 वाजेपर्यंत प्राणप्रतिष्ठेचा मुख्य कार्यक्रमला सुरुवात होईल. 12.29.08 ते 12.30.32 प्राणप्रतिष्ठेचा 84 सेकंदांचा शुभमूहूर्त आहे. दुपारी 1 वा. पंतप्रधानांची सभा आहे. दुपारी 2.10 वा. पंतप्रधान कुबेर टिल्याचे दर्शन घेणार. मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक कोपऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तर बाहेरही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या सोहळ्याला अवघ्या देशातीलच नव्हे जगातील रामभक्तांच्या उपस्थितीनं वातावरण राममय झालं आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते रामलल्लाची पूजा करण्यात येणार आहे. गर्भगृहात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. दुपारी 12.29 मिनिटांच्या मुहूर्तावर हा प्राणप्रतिष्ठापनेचा विधी करण्यात येईल. पंतप्रधान मोदी रामलल्लाच्या मुर्तीवरील पडदा हटवणार. अवघ्या 32 सेकंदाचा मुहूर्त या प्राणप्रतिष्ठापनेसाठी काढण्यात आला आहे. मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 84 सेकंदांचा मुहूर्त काढण्यात ाला आहे. रामलल्लाच्या डोळ्यांना काजळ लावणार. रामलल्लाला सोन्याचे वस्त्र परिधान करणार. रामलल्लाला 56 भोग चढवले जाणार आहेत. 1 मिनिट 24 सेकंदांची विशेष पूजा करण्यात येणार आहे.

23 जानेवारीपासून भाविकांसाठी मंदिर दर्शनाची वेळ सकाळी 7 ते 11.30 आणि नंतर दुपारी 2 ते 7 अशी असेल. राम मंदिरात सकाळी साडेसहा वाजता सकाळची आरती होईल, ज्याला शृंगार किंवा जागरण आरती म्हणतात. यानंतर दुपारी भोग आरती आणि सायंकाळी साडेसात वाजता संध्या आरती होईल. आरतीला उपस्थित राहण्यासाठी पास आवश्यक असेल.

दरम्यान, अयोध्येतील धरमपथ आणि रामपथ येथून भाविकांची मोठी गर्दी होत असताना, पोलीस रस्त्यावर गस्त घालताना दिसतात. रामललाच्या अभिषेक सोहळ्यासाठी राम मंदिर फुलांनी आणि विशेष दिव्यांनी सजवण्यात आलं आहे. मंदिर ट्रस्टच्या सूत्रांनी सांगितलं की, सजावटीसाठी फुलांचा "समृद्ध साठा" वापरण्यात आला आहे आणि 22 जानेवारी रोजी होणार्‍या सोहळ्याच्या दृष्टीने मंदिर सजवण्यासाठी फुलांचे विशेष डिझाईन तयार करण्यात आले आहे.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी