राज्यात कोरोना काळापासून पोलीस भरती झाली नव्हती. यामुळे पोलीस भरतीची तयारी करण्याऱ्या मुलांमध्ये प्रचंड नाराजी होती. मात्र, आता नुकताच राज्यसरकारने पोलीस भरतीची घोषणा केली. त्यानुसार पोलीस भरतीसाठी अर्जची सुरुवात करण्यात आली आहे. परंतु, प्रचंड काळानंतर सुरु झालेल्या भरतीत आता मुलांना अर्ज करण्यासाठी अडीचणींना सामोरे जावे लागत आहे.
या पोलीस भरतीवर लाखो युवक व युवतीचे भविष्य पणाला लागलेले आहे. मात्र, या ऑनलाईन अडीचणींमुळे मुलांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 30 नोव्हेंबर अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे, पण 20 नोव्हेंबरपासूनच शासनाने दिलेल्या नोंदणीच्या वेबसाईड जाम झाल्या आहेत. लाखो युवक व युवतीचे भविष्य पणाला लागलेले आहे. रात्रंदिवस सायबर केफे मध्ये बसून सुद्धा भरती प्रकियेत वारंवार अडचणी येत आहेत. त्यामुळे अजूनही हजारो मुलांचे भरतीचे फॉर्म भरले गेले नाहीत.
मात्र, दुसरीकडे गृहविभाग अद्यापही यावर स्पष्टीकरण देत नाहीय. जो पर्यंत भरती प्रक्रियेची वेब साईड पूर्ववत होत नाही व अखेरचा विद्यार्थी फॉर्म भरून पूर्ण होत नाही तो पर्यंत या प्रकियेला मुदतवाढ द्यावी देण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी करत आहे.