अमझद |कल्यान : अंबरनाथ रेल्वे स्थानकात (Ambernath railway station) बॅगेत बॉम्ब ठेवल्याचे सांगून रेल्वे पोलिसांची रात्रभर झोप उडवणाऱ्या दोघांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अतुल प्रजापती आणि प्रदीप प्रजापती असे अटक केलेल्या आरोपीचे नावे असून दोघेही कळवा भागात राहणारे रहिवासी आहेत. पोलिसांना कॉल करत त्रास देण्यासाठी केलेला खोडसाळपणा या दोघांच्या चांगलाच अंगलट आला आहे.
रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास एका इसमाने रेल्वेच्या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करत अंबरनाथ रेल्वे स्थानकात एका बॅगध्ये बॉम्ब ठेवल्याचे त्याने सांगितले. पोलिसांना माहिती मिळताच ताबडतोब बॉम्बशोधक पथक, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, रेल्वे स्थानकात सुमारे 150 लोहमार्ग पोलिसांचे पथक अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर रेल्वे पोलीस पथकाने प्लॅटफॉर्मवरील प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीची आणि प्रवाशांची तपासणी केली. मात्र पोलिसांना स्टेशन परिसरात काहीही आढळून आले नसल्याने पोलिसाने कंट्रोल फोन करणाऱ्या मोबाईल नंबरचा शोध सुरू केला. कॉल करणाऱ्या दोन जणांना कळवा परिसरातून ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता तो फेक कॉल त्यांनी केल्याची कबुली या दोघांनी दिली.
अतुल प्रजापती आणि प्रदीप प्रजापती हे दोघे कळवा परिसरात राहत असून अंबरनाथ मध्ये राहणारे आपल्या नातेवाईकांकडे भेटण्यासाठी आले होते. रात्री साडेबाराच्या सुमारास स्टेशनवरून घरी परतत असताना पोलिसाशी खोडसाळपणा करण्याच्या हेतूने या दोघांनी पोलीस कंट्रोल रूमला फेक कॉल केल्याचे दोघांनी सांगितले.