PM Narendra Modi 
ताज्या बातम्या

राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं विधान; म्हणाले, "येणाऱ्या वर्षांमध्ये आम्ही विकासकामांची गती..."

राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल करतानाच महायुती सरकारच्या अजेंड्याबाबत मोठं भाष्य केलं.

Published by : Naresh Shende

PM Narendra Modi Speech : आम्ही भारताच्या अर्थव्यवस्थेला जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. पण इथे असे काही विद्वान आहेत, ते म्हणतात यामध्ये काय आहे. हे तर होणारच आहे. हे आपोआप होणार आहे. हे लोक असे आहेत, ज्यांनी ऑटोपायलट मोडवर किंवा रिमोट पायलटवर सरकार चालवण्याची सवय आहे. त्यामुळे त्यांना काही करायचं नसतं. ते फक्त वाट बघत असतात. पण आम्ही मेहनतीत कोणतीही कमी ठेवत नाहीत. येणाऱ्या वर्षांमध्ये आम्ही विकासकामांची गती वाढवू आणि त्याचा विस्तारही वाढवला जाईल, असं मोठं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेतील भाषणादरम्यान केलं. लोकसभेनंतर आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर मोदींनी राज्यसभेत उत्तर दिलं. मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. यावेळी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी विरोधकांना शांत राहण्यासाठी समज दिली.

दहा वर्ष एकनिष्ठ अविरत केलेल्या सेवेला देशातील जनतेनं मनापासून समर्थन दिलं आहे. देशातील जनतेनं आशीर्वाद दिलं आहे. या निवडणुकीत देशवासीयांनी दाखवलेल्या विवेकबुद्धीबाबत अभिमान वाटतं. कारण त्यांनी प्रोपागॅन्डा संपवला आहे. देशातील जनतेनं केलेल्या कामगिरीबाबत फळ दिलं आहे. भ्रमाच्या राजकारणाला जनतेनं नाकारलं आहे. विश्वासाच्या राजकारणाला विजयाची मोहोर लावली आहे.

संविधानाच्या ७५ व्या वर्षात आपण प्रवेश करत आहोत. या सदनासाठीही हा महत्त्वपूर्ण क्षण आहे. कारण यालाही ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. देशाच्या सार्वजनिक आयुष्यात माझ्यासारखे अनेक लोक आहेत. ज्यांच्या कुटुंबात कुणी गावातील सरपंचही राहिला नाही. पण आज अनेक महत्त्वपूर्ण पदांवर पोहचून देशाची सेवा करत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे, त्यामुळे आमच्यासारख्या लोकांना संधी मिळाली आहे.

माझ्यासारखे अनेक लोक आहेत, ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे इथपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली आहे. जनतेनं यावर मोहोर लावली आणि तिसऱ्यांदा येण्याचं भाग्य लाभलं. संविधानाचं स्पीरिट आणि त्याचं मुल्यही आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कोणत्याही सरकारच्या कार्यकाळाता आमचं संविधान दिशादर्शक म्हणून काम करतं. २६ नोव्हेंबरला आम्ही संविधान साजरा करू, असं आमच्या सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं होतं. आज संविधानाची प्रत घातात घेऊन मिरवणाऱ्या लोकांनी विरोध केला, २६ जानेवारी तर आहे, मग हा संविदान दिवस का आणला आहे? असा प्रश्नही विरोधकांनी उपस्थित केला होता.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश