PM Narendra Modi Speech : लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर आले. यावेळी मोदींनी गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसह ३० हजार कोटींच्या विविध विकास कामांचं लोकार्पण केलं. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींवर स्तुतीसुमने उधळली. यावेळी मोदींनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. लोकांनी आमच्या तिसऱ्या सरकारचा उत्साहाने स्वागत केलं आहे. लोकांना माहित आहे की, एनडीए सरकारच स्थिरता देऊ शकतं. तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर मी म्हटलं होतं की, तिसऱ्या टर्ममध्ये एनडीए सरकार तीन पट वेगानं काम करेल. महाराष्ट्राकडे गौरवशाली इतिहास आहे. महाराष्ट्राकडे सशक्त वर्तमान आहे आणि महाराष्ट्राकडे समृद्ध भविष्याचं स्वप्न आहे. विकसीत भारताच्या निर्माणासाठी महाराष्ट्राची मोठी भूमिका आहे. महाराष्ट्रात उद्योगांची शक्ती आहे. महाराष्ट्रात शेतीची शक्ती आहे. महाराष्ट्राकडे आर्थिक शक्ती आहे. या शक्तीमुळं मुंबई आर्थिक हब बनलं आहे. याच शक्तीमुळे महाराष्ट्राला जगातील सर्वात मोठं आर्थिक पावर हाऊस बनवायचं आहे, असं मोठं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
महाराष्ट्रात आणि मुंबईतील ३० हजार कोटींच्या प्रकल्पाच्या लोकापर्णासाठी आलो आहे. या प्रकल्पांमुळे मुंबई आणि परिसरातील कनेक्टिव्हीटी अधिक चांगली होईल. यामध्ये रेल्वे आणि रोडच्या योजनांशिवाय महाराष्ट्रातील युवकांच्या कौशल योजनांची मोठी योजना सामील आहे. यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. २-३ आठवड्यांआधी केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी वाढवण बंदराला मंजुरी दिली आहे. ७६ हजार कोटींच्या या प्रकल्पामुळं इथे १० लाखांहून अधिक रोजगार बनतील.
लोकांनी आमच्या तिसऱ्या सरकारचा उत्साहाने स्वागत केलं आहे. लोकांना माहित आहे की, एनडीए सरकारच स्थिरता देऊ शकतं. तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर मी म्हटलं होतं की, तिसऱ्या टर्ममध्ये एनडीए सरकार तीन पट वेगानं काम करेल. महाराष्ट्राकडे गौरवशाली इतिहास आहे. महाराष्ट्राकडे सशक्त वर्तमान आहे आणि महाराष्ट्राकडे समृद्ध भविष्याचं स्वप्न आहे. विकसीत भारताच्या निर्माणासाठी महाराष्ट्राची मोठी भूमिका आहे. महाराष्ट्रात उद्योगांची शक्ती आहे. महाराष्ट्रात शेतीची शक्ती आहे. महाराष्ट्राकडे आर्थिक शक्ती आहे.
या शक्तीमुळं मुंबई आर्थिक हब बनलं आहे. याच शक्तीमुळे महाराष्ट्राला जगातील सर्वात मोठं आर्थिक पावर हाऊस बनवायचं आहे. मुंबईला जगातील बुद्धीवंतांची राजधानी बनवण्याचा माझा उद्देश आहे. भारतात महाराष्ट्र टूरिझममध्ये नंबर वन राज्य बनावं, अशी माझी इच्छा आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे विशाल किल्ले आहेत. कोकणच्या समुद्र किनाऱ्यावर मनमोहक दृष्य आहे. महाराष्ट्र भारतात विकासाची नवीन गाथा लिहिणार आहे, असंही मोदी म्हणाले.