Narendra Modi 
ताज्या बातम्या

पुण्यातील रेसकोर्स मैदानात PM मोदींचं मोठं विधान, म्हणाले; "देशाच्या पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये..."

Published by : Naresh Shende

तो दिवसही येईल, जेव्हा तुम्ही देशाच्या पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये प्रवास कराल. काँग्रेसने त्यांच्या दहा वर्षात इन्फ्रास्ट्रक्चरवर जेव्हढा खर्च केला, आम्ही एका वर्षात तेव्हढा खर्च करतो. आजचा भारत तरुणांचं कौशल्य आणि तंत्रज्ञानावर विश्वास ठेऊन पुढे जात आहे. स्टार्ट अप इंडियाने फक्त दहा वर्षात भारताच्या युवकांनी सव्वा लाखांहून अधिक स्टार्ट अप बनवले आहेत. यापैकी अनेक आपल्या पुण्यात आहेत, याचा अभिमान आहे. आपला देश जगात धमक दाखवत आहे. भाजपचा संकल्पपत्र या कामांना अधिक वेगानं नव्या स्तरावर घेऊन जाणार. दहा वर्षांपूर्वी भारत मोबाईल फोन इम्पोर्ट करत होता. दहा वर्षात माझ्या देशानं कमाल केली आहे. आता माझा देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठा एक्स्पोर्ट बनला आहे. आता आपण भारताला इलेक्ट्रिक व्हेईकलचा हब बनवणार आहोत. भारताला सेमी कंडक्टर हब, इनोवेशन हबला मजबूती द्यायची आहे. भारताला मॅन्यूफॅक्चरिंग हब बनवण्याचा भाजपचा संकल्प आहे, असं मोठं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील रेसकोर्स मैदानात आयोजीत केलेल्या महायुतीच्या सभेत केलं.

नरेंद्र मोदी जनतेला संबोधीत करताना म्हणाले, आमच्या सरकारने देशातील गरिब आणि सामान्यांचे पैसे वाचवण्याचा विचार केला. २०१४ आधी महागाई आणि भ्रष्टाचाराचा डबल टॅक्स वसूल केला. २०१४ मध्ये सरकार स्थापन झाल्यावर आम्ही महागाईवर नियंत्रण ठेवलं आणि भ्रष्टाचारावर कारवाई केली. आता भ्रष्टाचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.

देशात १५-२० हजार जनऔषधी केंद्र सुरु आहेत. त्यांना आम्ही वाढवणार आहोत. ७० वर्षांपुढील व्यक्तींच्या उपाचाराचा खर्च आता मोदी करणार आहेत. ही मोदींची गॅरंटी आहे. मोबाईल फोनशिवाय जीवन अशक्य झालं आहे. आयपॅडशिवाय काम होत नाही. डेटा खूप खर्च होतो. पहिल्या सरकारच्या विचाराने चालला असता, तर खूप ओझं झालं असतं.

प्रत्येक मध्यमवर्गातील लोकांची इच्छा होते की स्वत:चं घर असलं पाहिजे. मध्यमवर्गातील कुटुंबाला सुरक्षीत घरं मिळावं म्हणून आम्ही देशात रेराचा कायदा बनवला. सबका साथ, सबका विकास या मंत्रावर आमचं सरकार काम करतं. पहिल्या सरकारांनी ज्याला विचारलं नाही, त्यांनी मोदी काळजी घेतात. काँग्रेसच्या शहजादेंना विचारा, गरिबी कशी दूर केली जाते, ते म्हणतात खटाखट खटाखट. देशाचा विकास कसा होतो, ते म्हणतात ठखाठख ठखाठख. विकसीत भारताचा काही प्लॅन आहे, असं विचारल्यावर ते म्हणतात, टकाटक टकाटक... असं म्हणत नरेंद्र मोदींनी राहुल गांधींची खिल्ली उडवली.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा