Narendra Modi 
ताज्या बातम्या

१८ व्या लोकसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी PM नरेंद्र मोदींचं मोठं विधान; म्हणाले, "श्रेष्ठ भारत निर्माणासाठी..."

देशाच्या १८ व्या लोकसभेचं अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात सर्व खासदारांचा शपथविधी होणार असून सभापतीपदासाठीही निवडणूक होणार आहे.

Published by : Naresh Shende

Narendra Modi Speech : देशाच्या १८ व्या लोकसभेचं अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात सर्व खासदारांचा शपथविधी होणार असून सभापतीपदासाठीही निवडणूक होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. मोदी म्हणाले, मी सर्व नवनिर्वाचीत खासदारांचं स्वागत करतो. नवी उमेद, नवीन उत्साहात गतीनं उचं शिखर गाठण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. श्रेष्ठ भारत निर्माणासाठी, विकसीत भारताचं २०४७ चं लक्ष्य, हे सर्व संकल्प घेऊन आज १८ व्या लोकसभेची सुरुवात होत आहे. विश्वातील सर्वात मोठी निवडणूक खूप शानदार पद्धतीने संपन्न झाली आहे, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. १४० कोटी देशवासीयांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.

जवळपास ६५ कोटींहून अधिक मतदारांनी मतदानात सहभाग घेतला. ही निवडणूक यासाठी महत्त्वाची बनली आहे की, स्वातंत्र्यानंतर एखाद्या सरकारला लगातार तिसऱ्यांदा देशाची सेवा करण्यासाठी देशाच्या जनतेनं संधी दिली आहे. ही संधी ६० वर्षांनंतर मिळाली आहे. ही मोठी गौरवपूर्ण घटना आहे. देशाच्या जनतेनं तिसऱ्या कार्यकाळासाठी सरकारला पसंद केला आहे. म्हणजेच सरकारच्या नियतीवर, नीतीवर मोहोर लावली आहे. यासाठी मी देशवासीयांचं मनापासून आभार मानतो. सरकार चालवण्यासाठी बहुमत लागतं, हे आपल्याला माहित आहे.

पण देश चालवण्यासाठी सहमती खूप आवश्यक असते. प्रत्येकाला सोबत घेऊन भारतमातेची सेवा करण्याचा आमचा प्रयत्न असेल. १४० कोटी देशवासीयांच्या आशा आकांक्षा परिपूर्ण करू. आम्हाला प्रत्येकाला सोबत घेऊन पुढे जायचं आहे. सर्वांना सोबत घेऊन संविधानाच्या मर्यादांचं पालन करून निर्णयांना गती द्यायची आहे. १८ व्या लोकसभेत युवा खासदारांची संख्या चांगली आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. भारताची परंपरा ज्यांना माहिती आहे, भारताची संस्कृतीबद्दल ज्यांना माहिती आहे, त्यांना माहितीय की आपल्याकडे १८ नंबरचं खूप सात्विक मुल्य आहे. गीताचेही १८ अध्याय आहेत. कर्म, कतृत्व आणि करुणा काय असते, याचं ज्ञान आपल्याला मिळतं. अठराचं मुलांक नऊ आहे आणि नऊ पूर्णतेची गॅरंटी देतं. नऊ पूर्णतेचं प्रतिक अंक आहे. १८ वय असलेल्यांना आपल्या इथे मतदानाचा अधिकार मिळतो.

जे लोक या देशाच्या संविधानाप्रती समर्पीत आहेत, जे लोक भारताच्या लोकशाहीच्या परंपरेवर निष्ठा ठेवताता, त्यांसाठी २५ जून अविस्मरणीय दिवस आहे. भारताच्या लोकशाहीला काळा डाग लागला होता, त्याचे ५० वर्ष पूर्ण होत आहेत. भारताची नवीन पिढी या गोष्टीला कधीच विसरणार नाही, भारताच्या संविधानाला पूर्णपणे नाकारलं होतं. देशाला जेलखाना बनवलं होतं. लोकशाही पूर्णपणे उध्वस्त केली होती. भारतात आता कुणीच अशी हिंमत करणार नाही, जी ५० वर्षांपूर्वी (राष्ट्रीय आणीबाणी) केली होती. त्यामुळे लोकशाहीला काळा डाग लागला होता. जीवंत लोकशाहीचा आपण संकल्प करणार आहोत. भारताच्या संविधानानुसार सामान्य माणसांचं स्वप्न पूर्ण करण्याचा आपण संकल्प करणार आहोत. देशाच्या जनतेनं आम्हाला तिसऱ्यांदा संधी दिली आहे. हा खूप मोठा विजय आहे. मी देशवासीयांना विश्वास देतो की, आम्ही सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाता पहिल्यापेक्षा तीन पटीने जास्त मेहनत करू.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश