Narendra Modi On Congress : काँग्रेस सरकारने विकासाला ब्रेक लावला होता. मोदींनी ब्रेक तर हटवलाच, पण गाडीला टॉप गिअरमध्येही नेलं. भिवंडी-कल्याण महामार्ग समृद्धी एक्स्प्रेसवेला जोडलेला आहे. मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेही लवकरच पूर्ण होणार आहे. वडोदरा-मुंबई द्रुतगतीचा लाभही भिवंडीला मिळणार आहे. रोजगारनिर्मीती वाढेल. म्हणून या ठिकाणी जनतेचा विश्वास आहे आणि पुन्हा एकदा मोदी सरकारच येणार. काँग्रेस कधीही विकासकामं करु शकत नाही. काँग्रेस फक्त हिंदू-मुस्लिम करणं माहित आहे. जे त्यांना मतदान करतात, काँग्रेस त्याच लोकांचा विकास करतं, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. ते कल्याणमध्ये कपिल पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
काँग्रेसने गेले कित्येक वर्ष गरिबी हटावचा खोटा नारा दिला. प्रत्येक निवडणुकीत अफिमच्या गोळीची माळ तयार करून आणायचे. नेहरुंच्या निवडणुकीपासून २०१४ पर्यंत ते गरिब, गरिब अशी माळ जपायचे. असाच खेळ त्यांनी सुरु केला होता. असे लोक देशाचं नेतृत्व करु शकतात का? असे लोक देशाला पुढे नेऊ शकतात का, तुमचे स्वप्न पूर्ण करु शकतात का? तुमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करु शकतात का? असा सवालही मोदींनी उपस्थित केला.
जनतेला संबोधीत करताना मोदी पुढे म्हणाले, मी राष्ट्रकल्याणासाठी कल्याणच्या भूमीत तुमचा आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे. राष्ट्राचं कल्याण, गरिबाचं कल्याण करणार, हे मी गर्वाने म्हणतोय. २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलेलं देश पाहत आहे. प्रत्येक गरिबासाठी पक्क घर बनवण्याचं काम सुरु आहे. प्रत्येक घरात नळाचं पाणी पोहोचावं, हे अभियान सुरु आहे. गरिबासाठी मोफत उपचार घेण्यासाठी गॅरंटी कार्ड आहे. गरिबाच्या मुलाच्या सरकारने गरिबाला सर्वात मोठी प्राथमिकता दिली आहे. आज पहिल्यांदा भारतात नवीन आत्मविश्वास आपण पाहत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून भारत आज मोठे लक्ष्य गाठत आहे.
सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या शंभर दिवसात काय काम करायचं आहे, कोणते निर्णय घ्यायचे आहेत? यासाठी सतत काम केलं आहे. सरकार आल्यानंतर माळा घालून फिरायचं नाही. आज जेव्हढी मेहनत करत आहे, तेव्हढीच मेहनत ४ जूननंतर सुरु राहील. १०० दिवसात काय करायचं आहे, याचं ब्लू प्रिंट तयार करून आम्ही पुढे जात आहोत. मोदींच्या आत्मविश्वासाच मुद्दा नाही. तर जनतेचा आमच्यावर असलेल्या विश्वासाचा मुद्दा आहे.
मी जेव्हा काशीमध्ये होतो, मी पाहिलं, देशाच्या तरुणाकडे नवीन कल्पना आहे. प्रत्येक गोष्टीला नव्यानं करण्याची त्यांच्याकडे कल्पना आहे. या गोष्टींमुळे मी खूप प्रभावित झालो आहे. मला देशाच्या तरुणांना एक वैयक्तिक विनंती करायची आहे. मी या तरुणांना भेटल्यावर त्यांनी मला मोलाचे सल्ले दिले आहेत. माझं १०० दिवसांचं व्हिजन मी १२५ दिवसांचं करावं, असं मला वाटतं. कारण देशातील तरुण मंडळी जे काही विचार करतील, ते त्यांनी मला या पाठवावे. कारण या २५ दिवसांत मी त्यांच्या मुद्द्यांचा समावेश करेल, असंही मोदी म्हणाले.