स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत देशभरात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आता याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हर घर तिरंगा' ही मोहीम राबवण्याचं आवाहन केलं आहे. देशवासियांनी या मोहिमेत सहभागी व्हावं, असं म्हणत त्यांनी एक ट्वीट केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं ट्वीट
देशाचा तिरंगा हा स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. प्रत्येक भारतीयाचं आपल्या ध्वजाशी भावनिक नातं आहे. तिरंगा आपल्याला राष्ट्रीय प्रगतीसाठी कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा देतो. मी तुम्हांला सर्वांना विनंती करतो की १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी व्हा. तिरंग्यासह तुमचे फोटो अपलोड करा
ट्वीटमध्ये पंतप्रधानांनी https://harghartiranga.com ही लिंक दिलेली आहे. यामध्ये प्रत्येकाला तिरंग्यासोबतचा फोटो अपलोड करता येणार आहे.