पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्या आई हिराबेन मोदी ( Heeraben Modi ) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. स्वत: पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या निधनाची माहिती ट्विट करत दिली आहे. मोदींनी घरीच आईच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. त्यानंतर रुग्णवाहिकेमधून पार्थिव स्मशानभूमीमध्ये अंतिमसंस्कारासाठी नेताना मोदींनी रुग्णवाहिकेमधूनच प्रवास केला. रुग्णवाहिकेपर्यंत पार्थिव नेताना मोदींनीच पार्थिवाला खांदा दिला.
२८ डिसेंबर रोजी यूएन मेहता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. पंतप्रधान मोदी त्याच दिवशी आईला भेटण्यासाठी अहमदाबाद गेले होते. आज रात्री साडेतीनच्या सुमारास हिराबेन मोदी यांनी अखेरचा श्वास घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी गांधीनगरमधील घरी पोहोचले. आईच्या पार्थिवाचं दर्शन त्यांनी घेतलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी अनंतात विलीन झाल्या आहेत. पंतप्रधान मोदी आणि त्यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांनी आईला मुखाग्नी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं आज निधन झालं आणि त्या अनंतात विलीन झाल्या. परंतु पंतप्रधानांच्या नियोजित कार्यक्रमांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालमधील आजच्या नियोजित कार्यक्रमांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सामील होतील. या कार्यक्रमांमध्ये कनेक्टिव्हिटीशी संबंधित महत्त्वाच्या प्रकल्पांचा शुभारंभ आणि राष्ट्रीय गंगा परिषदेची बैठक यांचा समावेश आहे.
"तेजस्वी शतक ईश्वराच्या चरणी विसावत आहे... आईमध्ये मला ते त्रिमूर्ती नेहमीच जाणवते, ज्यामध्ये एका तपस्वीचा प्रवास, निस्वार्थी कर्मयोगी आणि मूल्यांसाठी वचनबद्ध जीवनाचे प्रतीक आहे. समाविष्ट केले आहे". असं म्हणत पंतप्रधान मोदींनी आईच्या मृत्यूबद्दलची माहिती दिली आहे.