देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी नागपूर दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते नागपूर मेट्रोचं लोकार्पण आणि समृद्धी महामार्गाचंही लोकार्पण होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर येत असल्याने आता साऱ्या राज्यासह भाजपमधील नेत्यांच्या नजरा या कार्यक्रमाकडे लागून राहिल्या आहेत. त्यामुळे या दौऱ्याची तयारी आता पासूनच सुरु झाली आहे.
मागील काही महिन्यांपासून नागपूर मेट्रो आणि समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. ते काम आता पूर्ण झाले असून या दोन्ही कामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर मेट्रो आणि समृद्धी महामार्गाचं लोकार्पण करणार असून त्यासाठी आता पेंडॅाल सज्ज ठेवण्यात आले आहेत. या पेंडॉलमध्ये किमान दहा ते पंधरा हजार लोकं बसू शकतील एवढ्या भव्य दिव्य आकारात हा पेंडॉल उभा करण्यात आला आहे.समृद्धी महामार्गावरील वायफळ टोलप्लाझा येथे लोकार्पण सोहळा होणार आहे.