नवी दिल्ली : मी फक्त फायलींवर सही करत असतो तेव्हाच पंतप्रधान असतो, एकदा सही करुन फाईल दूर गेली की मी प्रधानसेवक असतो, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले आहे. मोदी सरकारला (Modi Government) 8 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हिमाचल प्रदेशातल्या शिमला येथे गरीब संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी फक्त फायलींवर सही करत असतो. तेव्हाच पंतप्रधान असतो, एकदा सही करुन फाईल दूर गेली की मी प्रधानसेवक असतो. मी फक्त जनतेसाठी काम करतो आणि 24 तास प्रधानसेवकाच्या रुपात आहे. 130 कोटी देशवासियांच्या कुटूंबातील मी एक सदस्य आहे. या सदस्याच्या स्वरुपात मी ज्याही ठिकाणी राहतो. तेथे प्रधानसेवकाच्या रुपात राहून देशासाठी काम करत असतो, असे त्यांनी म्हंटले आहे
कॉंग्रेसवर टीका करताना ते पुढे म्हणाले, देशाच्या सीमा सध्या जेवढ्या सुरक्षित आहेत, तेवढ्या 2014 पूर्वी कधीच नव्हत्या, असा दावा मोदींनी केला आहे. तर देशाचं रक्षण करा असं राहुल गांधी दरवेळी म्हणत आहेत, त्याला प्रत्युत्तर म्हणूनच मोदींनी हा दावा केला आहे.
आपण 2014 पासूनची स्थिती बघितली तर किती मोठा प्रवास करुन आलो आहे, हे समजेल. सिस्टम तीच आहे. पण, त्याला गरीबांसाठी जास्त संवेदनशील बनविले आहे. अनेक समस्यांना कायमस्वरुपी तोडगा दिला आहे. देशात सर्व कुटूंबांपर्यंत सरकाच्या योजना पोहोचल्या आहेत, याचा मला अभिमान आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे. आम्ही वोट बँकसाठी काम करत नाही. तर नव्या भारतासाठी काम करतो. योजनेचा लाभ-तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा विडा आम्ही उचलला आहे आणि तो पूर्ण करणार, असेही मोदींनी सांगितले आहे.