विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमक्यांचे सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. आज 85 विमानांना बॉम्बची धमकी मिळाली आहे. यामध्ये एअर इंडिया, इंडिगो, विस्तारा आणि अकासा एअरलाईन्सच्या विमानांचा समावेश आहे.
देशामध्ये प्रवासी विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमक्यांचे सत्र सुरूच आहे. आज 85 विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. यामध्ये एअर इंडियाच्या 20, इंडिगोच्या 20, विस्ताराच्या 20 आणि अकासा एअरच्या 25 विमानांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून शेकडो विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. यामुळे 200 कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, या घटनांमुळे सरकार अलर्ट मोडवर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी पोलिसांनी 90 हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्यामुळे आठ दिवसांत आठ स्वतंत्र एफआयआर नोंदवले आहेत. ही उड्डाणे दिल्लीहून विविध देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ठिकाणांवर चालतात. या प्रकरणांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.