Rohit Sharma  
ताज्या बातम्या

टी-२० वर्ल्डकपआधी भारताच्या अडचणी वाढल्या, कर्णधार रोहित शर्माला दुखापत, 'या' खेळाडूनं दिली मोठी अपडेट

Published by : Naresh Shende

Rohit Sharma Injury Update : टी-२० वर्ल्डकपची रणधुमाळी सुरु होण्याआधी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला आहे. परंतु, रोहितला झालेली दुखापत जास्त गंभीर नाहीय. रोहितच्या पाठित थोडी वेदना होत असल्याने कोलकाता नाईट रायडर्स विरोधात काल झालेल्या सामन्यात रोहितनं क्षेत्ररक्षण केलं नाही. वानखेडे स्टेडियममध्ये कोलकाताविरोधात मुंबई इंडियन्स जेव्हा मैदानात उतरली, त्यावेळी हार्दिक पंड्याने मोठी अपडेट दिली होती. या सामन्यात रोहित शर्मा इॅम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळत आहे. रोहित क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरणार नाही. रोहित इॅम्पॅक्ट प्लेयर म्हणून का खेळत आहे, याबाबत अनेकांना प्रश्न पडला होता.

पियुष चावलाने रोहित शर्माच्या दुखापतीवर दिली मोठी अपडेट

मंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांचा सामना संपल्यानंतर प्रमुख फिरकीपटू गोलंदाज पियुष चावलाने यामागचं कारण सांगितलं आहे. रोहित शर्मा थोड्या दुखापतीनं त्रस्त होता. या सामन्याआधी रोहित शर्माच्या पाठीत थोडी वेदना होत होती. त्यामुळे मॅनेजमेंटने रोहितला क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात पाठवलं नाही, अशी प्रतिक्रिया पियुष चावलाने दिली.

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतासाठी रोहित शर्मा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे रोहितचं पूर्णपणे फिट असणं खूप गरजेचं आहे. रोहितची दुखापत वाढली, तर भारतीय क्रिकेट संघासाठी आणि चाहत्यांसाठी हा खूप मोठा धक्का असेल. रोहित शर्मा सातत्याने क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे त्याला दुखापतीचा सामना करावा लागत आहे.

शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएलचा जबरदस्त सामना रंगला. वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा २४ धावांनी पराभव केला. रोहित शर्माला या सामन्यातही धावांचा सूर गवसला नाही. रोहित ११ धावांवर असताना बाद झाला.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा