संदिप जेजुरकर, नाशिक
नाशिकच्या देवळा तालुक्यातील फुलेमालवाडी गावकऱ्यांनी चक्क गावच विकायला काढले आहे. त्यामुळे सगळीकडे या गावाच्या निर्णयाची चर्चा होऊ लागली आहे. मात्र, गावकऱ्यांवर गाव विकण्याची वेळ का आली असा सवाल आता उपस्थित होत आहे. कुठल्याच शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी थेट शासनालाच गाव विकण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये शासनाला ठराव करून गाव विकण्याचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे. गावकऱ्यांनी एकत्र येत याबाबत ठराव देखील केला आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने गावकरी चिंतेत आहेत. त्यामुळे गाव विकून त्यातील पैशाने आम्हाला जगता येईल असा निर्णय घेत गावकऱ्यांनी गाव विकण्याचा निर्णय घेतला आहे. गावच्या या निर्णयामुळे शासकीय यंत्रणेसह लोकप्रतिनिधींची मोठी अडचण झाली आहे.