Admin
ताज्या बातम्या

कल्याणमधून पी एफ आय कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात

कल्याणमधील पी एफ आय कार्यकर्ता फरदीन पैकरला कल्याणच्या बाजारपेठ पोलिस आणि ठाणे खंडणी विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत ताब्यात घेतले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अमजद खान, कल्याण

कल्याणमधील पी एफ आय कार्यकर्ता फरदीन पैकरला कल्याणच्या बाजारपेठ पोलिस आणि ठाणे खंडणी विरोधी पथकाने संयुक्त कारवाईं करत ताब्यात घेतले आहे. फरदीन कल्याण मधील रोहिदास वाडा परिसरात राहत आहे. आज पहाटेच्या सुमारास फरदीनला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान फरदीन ने कोणतेही चुकीचं कृत्य केलं नाही ,आमचा कायद्यावर पूर्ण विश्वास असल्याची प्रतिक्रिया त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे.

देशभरात पी एफ आय या संघटनेविरोधात देशातील सुरक्षा यंत्रणेने कारवाई सुरू केली आहे . कल्याणमध्ये देखील आज पहाटेच्या सुमारास ठाणे खंडणी विरोधी पथक आणि बाजारपेठ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पीएफआय कार्यकर्ता फरदीन पैकर याला ताब्यात घेतलं. फरदीन आपल्या आई आणि पत्नी सोबत कल्याण पश्चिमेकडील रोहिदास वाडा परिसरात आझाद चाळीत राहत आहे .अनेक वर्षांपासून या परिसरात तो सामाजिक कार्य करत असल्याची माहिती देखील समोर येतेय

बाजारपेठ पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली या चौकशीत काय निष्पन्न होतो याकडे आता सर्वांचाच लक्ष लागले आहे.

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...