मागील काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलचे भाव (Petrol Diesel) गगनाला भिडले आहेत. वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या किमतींमुळे वाहनचालक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीमध्ये आज (मंगळवारी) ऑल इंडिया पेट्रोल पंप असोसिएशनकडून (All India Petrol Pump Association)राज्यभरातील पेट्रोल पंप (Petrol Pump) चालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पेट्रोल, डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात आज आणि उद्या पेट्रोल-डिझेलचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे.
सर्वसामन्य जनतेचा आर्थिक संकटातून आणि वाढत्या महागाईतून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) उत्पादन शुल्कात कपात केली. मात्र या कपातीमुळे पेट्रोलियम डिलर्सचे नुकसान झाले आहे. याबाबत फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएननेचे (All Maharashtra Petrol Dealers Association) पत्रक प्रसिद्ध झाले आहे. या पत्रकानुसार, 2017 पासून पेट्रोल डिलर्स मार्जिनमध्ये सुधारणा झालेली नाही. शासन व ऑइल कंपन्यांसोबत झालेल्या करारानुसार दर 6 महिन्यांनी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकांशी निगडीत केले असून, याची अंमलबजाणीही झालेली नाही.
2017 सालापासून आतापर्यंत इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत. या वाढत्या किंमतींमुळे गुंतवणूक, खर्च, बँकांचे व्याज, वेतन, विद्युत देयके, शासकीय शुल्कासह अन्य खर्चातही वाढ झाली. त्यामुळे इंधनाचे दर कमी करण्यासाठी आमचा पाठिंबाच आहे. मात्र शासनाने स्वत: 16 जूने 2017 रोजी सुरू केलेली डेली प्राईज चेंज पद्धत असता बदलली आणि ऑइल कंपन्यांना सोयीच्या घोषणा करताना डिलर्सचे नुकसान होणार नाही, याची खरबदारी घेणे आवश्यक आहे.
पूर्वीची दर 15 दिवसांनी दर बदलण्याची पद्धत सुरू करावी, अशी मागणी असोसिएशनने केली. 2017 पासून कंपन्यांनी डीलरच्या कमिशनमध्ये वाढ केलेली नाही. इंधनाचे दर वाढल्याने त्यांची गुंतवणूक वाढत असताना नफा कमी झाला. त्यामुळे कमिशनमध्येही वाढीची मागणी केली. सर्व मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेणे, कमिशन वाढावे, यासाठी ‘नो पर्चेस डे’ पाळण्यात येणार आहे.