केंद्र सरकार (central government)लवकरच पेट्रोल आणि डिझेलवरील (Petro-Disel)उत्पादन शुल्क कमी करुन सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे. देशातील अनेक राज्यांत पेट्रोलचे दर हे अत्यंत वाढले असून, मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या खिशाला फटका या दरवाढीमुळे बसत होता. त्यानंतर आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार पेट्रोलचे दर साडेनऊ रुपये तर डिझेलचे दर ७ रुपयांपर्यंत कमी होणार असल्याची शक्यता आहे. आज मध्यरात्रीपासून नवीन दर लागू होणार आहे.
देशात सध्या इंधन दरामध्ये मोठी वाढ झाली असून, त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे विरोधक देखील या मुद्दयावरुन केंद्र सरकारला धारेवर धरताना पाहायला मिळाले. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्याच्या प्रयत्नातून केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचं समजतंय.
पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किमतींवरून सातत्याने टीका सुरु होती. यामुळे केंद्र सरकारने या उत्पादनांवरील अबकारी कर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.
निर्मला सीतारमण यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "केंद्राने पेट्रोलवर 8 रुपये प्रति लिटर आणि डिझेलवरील 6 रुपये प्रति लिटर केंद्राचा
उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पेट्रोलचे दर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी होणार आहे.
सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त
पीएम उज्ज्वला योजनेच्या सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी देण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. एका कुटुंबाला वर्षभरात 12 सिलिंडर मिळतील. 9 कोटी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे.
वर्षभरात दुसऱ्यांदा कपात
यापूर्वी, 3 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 5 रुपयांनी कमी केले होते.