शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
आयएनएस विक्रांत (ins vikrant) प्रकरणात भाजपाचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांना दिलासा मिळ्यानंतर राऊत यांनी न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टिका केली होती.
या प्रकरणात आता राऊत बार काऊन्सीलने राऊत यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल केली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि (cm uddhvh thackeray ) राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांचीही नावं आहेत.
“उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींविरोधात खोटे, (प्रतिष्ठेला) कलंक लावणारे आणि अवमानजनक आरोप केल्याप्रकरणी” ही याचिका दाखल करण्यात आल्याचं एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.