ताज्या बातम्या

Megablock: प्रवाशांनो इथं लक्ष असू द्या! आज हार्बर आणि मध्य मार्गांवर रेल्वेचा मेगाब्लॉक

Published by : Dhanshree Shintre

मध्य रेल्वेकडून 01 सप्टेंबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभाल, दुरुस्तीच्या कामांसाठी उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी 11.05 ते दुपारी 03.55 वाजेपर्यंत माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येऊन शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. त्यानंतर पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन गंतव्यस्थानावर नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिरा पोहोचेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.34 ते दुपारी 03.36 पर्यंत पनवेल / बेलापूर / वाशीसाठी जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करिता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल लोकल असेल. ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.18 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी 3.44 वाजता सुटेल. ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करिता पनवेल येथून सकाळी 10.05 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी पनवेल येथून दुपारी 3.45 वाजता सुटेल.

Diwali 2024: दिवाळीत दाराबाहेर दिवे लावताय! यावेळी दिव्यांची "या"प्रकारे करा खास सजावट

Malad Road: मुलाला वाचवण्यासाठी आई बनली ढाल! तरी जमावाची युवकाला निपचित पडेपर्यंत मारहाण

Manoj Jarange | आचारसंहिता लावुन मराठ्यांचं वाटोळं केलं- मनोज जरांगे संतापले

Baba Siddique हत्याप्रकरणातील चौथा आरोपी पकडला

Maharashtra Vidhansabha Election Date|महाराष्ट्राच्या विधानसभेची तारीख जाहीर | #election2024