पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाज मनू भाकरने 10 मीटर पिस्टलमध्ये कांस्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू ही पहिली महिला नेमबाज ठरली आहे. नेमबाजीत भारताच्या मनू भाकेरने कांस्य पदक जिंकत यंदाच्या ऑलिम्पिक २०२४ मधील पहिले पदक पटकावून दिले आहे. पॉईंट १ गुणाने मागे राहिल्याने मनू भाकेरला तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले.
पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे. मनू भाकेर २१व्या शॉटने दुसऱ्या स्थानावर पोहोचली होती, पण अखेरीस ती तिसऱ्या स्थानावर राहिली. कोरियाच्या दोन्ही नेमबाजांनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. मनू भाकेर ही भारताला नेमबाजीमध्ये भारताला पदक जिंकवून देणारी पहिली महिला नेमबाज ठरली आहे. सुरूवातीपासूनच मनू दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी कायम होती पण अवघ्या एका पॉईंटने मनू मागे राहिली. पण तिने भारताला पदक पटकावून दिलं.
फायनलमध्ये मनू भाकरचा स्कोर
पहिली 5 शॉट सीरीज: 10.6, 10.2, 9.5, 10.5, 9.6, एकूण 50.4
दुसरी 5 शॉट मालिका: 10.1, 10.3, 9.6, 9.6, 10.3, एकूण: 49.9
उर्वरित शॉट्स: 10.5, 10.4, 9.8, 9.8, 9.9, 10.2, 10.1, 10.2, 10.1, 10.0, 10.1,10.3
कोण आहे मनू भाकर?
22 वर्षांची मून भाकर ही मूळची हरियाणातल्या झज्जर तालुक्यातली आहे. मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिने आपला ठसा उमटवलेला आहे.
नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला नऊ सुवर्ण
जागतिक नेमबाजीत मनू भाकरनं आतापर्यंत दोन सांघिक पदकं मिळवलेली आहेत. तर नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला नऊ सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं मिळालेली आहेत. मनू भाकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलेलं आहे. 2022 साली मनू भाकरला एशियाडचं एक सांघिक सुवर्णपदक मिळालं होतं.