pakistani army : पाकिस्तानी लष्कराचे हेलिकॉप्टर उत्तर-पश्चिम बलुचिस्तान प्रांतात सोमवारी रात्रीपासून बेपत्ता झाले, ज्याचा अवशेष लासबेला जिल्ह्यातील मुसा गोठजवळ सापडला. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 6 जवानांचा मृत्यू झाला असून, त्यांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. माहितीनुसार, खराब हवामानामुळे हा अपघात झाला. पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया शाखेने सांगितले की, लेफ्टनंट जनरल सरफराज अली यांच्यासह सर्व 6 लष्करी जवानांचा या अपघातात मृत्यू झाला. (pakistani army helicopter found balochistan six soldiers killed accident pakistan)
आयएसपीआरचे महासंचालक (डीजी) यांनी ट्विट केले की, लसबेला जिल्ह्यातील मुसा गोठ येथे हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले. यामध्ये लेफ्टनंट जनरल सरफराज अली यांच्यासह सर्व ६ अधिकारी आणि जवानांचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले की, पाकिस्तानी लष्कराच्या जवानांच्या मृत्यूने देशाला खूप दुःख झाले आहे. लेफ्टनंट जनरल सरफराज अली आणि पाकिस्तानी लष्करातील इतर 5 अधिका-यांच्या हौतात्म्याने देशाला दु:ख झाले आहे. पूरग्रस्तांना मदत देण्याचे उदात्त कार्य ते करत होते. या सुपुत्रांचा देश सदैव ऋणी राहील. मी शोकाकुल कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो.