Admin
ताज्या बातम्या

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी; पाहा व्हिडिओ

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी सायंकाळी पुण्यातील मुस्लीम समुदायामधील काही व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरोधात (पीएफआय) राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केलेल्या कारवाई विरोधात आंदोलन करण्यात आले होते.

Published by : Siddhi Naringrekar

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी सायंकाळी पुण्यातील मुस्लीम समुदायामधील काही व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरोधात (पीएफआय) राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केलेल्या कारवाई विरोधात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात पाकिस्तान जिंदाबाद’, ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ तसेच ‘आरएसएस मुर्दाबाद’ अशी घोषणाबाजी करण्यात आल्या.

या घोषणाबाजी प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी रियाज सय्यद आणि ६० ते ७० पीएफआय कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीएफआयविरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचं नियोजन या आंदोलकांनी केलं होतं. मात्र हे आंदोलन सुरु होण्याच्या आधीच पुणे पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय