ताज्या बातम्या

पाकिस्तानाचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 10 वर्षांची शिक्षा; काय आहे नेमके प्रकरण?

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा झटका बसला आहे. त्यांना आज 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. सायफर प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

इम्रान खान व्यतिरिक्त देशाचे माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनाही या प्रकरणात समान वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अधिकृत गोपनीय कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने दोन्ही नेत्यांविरोधात हा निर्णय दिला आहे.

इम्रान आणि शाह महमूद कुरेशी यांच्याविरुद्धचा हा सायफर खटला राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. इम्रान खान यांच्यावर सर्वोच्च गुप्त माहितीचा वैयक्तिक वापर केल्याचा आरोप आहे. सत्तेतून हकालपट्टी झाल्यानंतर इम्रान यांनी आपल्या हकालपट्टीमागे अमेरिका असल्याचा आरोप केला होता. इम्रान खान यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी गुप्त माहिती सार्वजनिक केले होते. त्याला ‘सिफर’ असे म्हणतात.

यापूर्वी डिसेंबर २०२३ मध्ये देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान आणि शाह महमूद कुरेशी यांच्या अटकेनंतरचा जामीन मंजूर केला होता. या कालावधीत, माजी पंतप्रधान इतर प्रकरणांमध्ये तुरुंगात होते, तर माजी परराष्ट्र मंत्र्यांची संभाव्य सुटकाही रोखण्यात आली होती. कारण त्याला 9 मे रोजी आणखी एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. सध्या दोन्ही नेते तुरुंगात आहेत. ऑक्टोबर 2023 मध्ये या प्रकरणात या दोघांची नावे पहिल्यांदा समोर आली होती.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा