पाकिस्तानमध्ये खाण्यापिण्याचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. पाकिस्तानात पीठ, तेल, कांदा आणि डाळी यांसारख्या खाद्यपदार्थांचे भाव गगनाला भिडले आहेत. पाकिस्तानवरील वाढते कर्ज, पेट्रोल-डिझेल आणि विजेच्या वाढत्या किमती, घटत चाललेला परकीय चलन साठा, जागतिक चलनवाढ, राजकीय अस्थिरता आणि जीडीपीच्या वाढीतील मंदी या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी पाकिस्तानला कठोर संघर्ष करावा लागत आहे.
पाकिस्तानवरील आर्थिक संकट दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे. मालमत्ता विकून देश चालवण्याची वेळ पाकिस्तानवर आली आहे. पाकिस्तानच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील विजेचा वापर वाचवण्यासाठी सरकारने हा शॉपिंग मॉल आणि बाजारपेठा रात्री 8:30 नंतर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानमधील वीजेचा साठाही संपुष्टात येताना दिसत आहे.
पाकिस्तानमध्ये डाळ, पीठ, कांदा, तेल यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडले आहेत. खाद्यपदार्थांच्या किंमती प्रचंड वाढल्यामुळे सर्वसामान्यांना हे परवडत नाही आहे. जीवनावश्यक विकत घेणे म्हणजे सर्वसामान्यांसाठी कठीण झाले आहे. पाकिस्तानमधील आर्थिक संकट इतके वाढले आहे की सरकारने काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील पाकिस्तानी दूतावासाच्या मालमत्तेचा लिलाव केला. पाकिस्तानातील लाहोरमध्ये पिठाचा मोठा तुटवडा आहे. जिथे बहुतांश दुकानांमध्ये पीठ मिळत नसल्यामुळे पिठाच्या किमतीत वाढ झाली आहे. पाकिस्तानातील 15 किलोच्या पिठाच्या पॅकेटची किंमत 3000 रुपयांच्या पुढे गेली आहे, असे पाकिस्तानी वृत्तवाहिनी म्हटले आहे.