केंद सरकारकडून कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्यातील अनेक शेतकरी संघटना रस्त्यावर उतरत आक्रमक भूमिका घेत आहेत.याविरोधात ठिकठिकणी शेतकरी आंदोलन करत आहेत. तात्काळ केंद्र सरकारने निर्यात शुल्क रद्द करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर आता उद्यापासून बाजार समित्या सुरु होणार आहेत. कांद्याचा बेमुदत बंदचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. उद्यापासून कांद्याचे लिलाव सुरु होणार आहे. केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या मध्यस्तीला यश आले आहे.