ताज्या बातम्या

Lok Sabha Election 2024: एकाच तरुणानं केलं चक्क 8 वेळा मतदान; व्हिडीओ व्हायरल...

Published by : Dhanshree Shintre

देशभरात लोकसभा निवडणुकांचा पाचवा टप्पा पार पडला आहे. देशभरातील 49 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडली आहे. देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं गेलं. अशातच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओनं खळबळ माजली आहे. एकाच व्यक्तीनं एक नाही, दोन नाही तर तब्बल आठ वेळा मतदान केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. धक्कादायक बाब म्हणजे त्याने स्वत:च हा व्हिडीओ शूट केला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी एपआयआर दाखल करण्यात आला आहे.

मतदान केंद्रावरील सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाने पुन्हा मतदान घ्यावे अशी शिफारस करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील उर्वरित टप्प्यातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना मतदारांची ओळख पटवण्याची प्रक्रिया कठोरपणे पाळण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा