Jammu and Kashmir  admin
ताज्या बातम्या

काश्मिरात पुन्हा हिंदू टार्गेट, बँक व्यवस्थापकाची गोळ्या घालून हत्या

Published by : Team Lokshahi

गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये हिंदूचे हत्यासत्रात (Terrorist fires)सुरु आहे. त्यात आणखी एक बळी गेला आहे. दक्षिण काश्मीरच्या (jammu and kashmir)कुलगाम जिल्ह्यात गुरुवारी बँक व्यवस्थापकाची दहशतवाद्यांकडून हत्या केली. दोन दिवसांपुर्वीच काश्मीरमध्ये एका शिक्षिकेची(Teacher)शाळेबाहेर हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा हा प्रकार घडल्याने हिंदूचे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरु झाले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. येथील हिंदूंना दहशतवादी सातत्याने लक्ष्य करत आहेत. गुरुवारी कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी राजस्थानमधील एका बँक मॅनेजरवर गोळीबार केला. या हल्ल्यात बँक व्यवस्थापक विजय कुमार यांचा मृत्यू झाला. यापूर्वी कुलगाममध्येच दहशतवाद्यांनी एका हिंदू महिला शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या केली होती.

काश्मिरी पंडितांकडून परराज्यातून आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी पोस्टिंग देण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी आंदोलनही काश्मिरी पंडित करत आहे. त्यानंतर जम्मू काश्मीर प्रशासनाने बुधवारीच याबाबत आदेश दिले होते. ६ जूनपर्यंत अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांची सुरक्षित स्थळी बदली होणार आहे. काश्मिरात हत्येच्या घटना वाढल्यानं गृहमंत्रालय अलर्ट मोडवर आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हांसोबत बैठक घेणार आहे. अमित शाह हे जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेणार असल्याची देखील माहिती आहे.

खोऱ्यातील हत्यासत्र

31 मे- कुलगाममधील गोपालपोरा येथे दहशतवाद्यांनी एका हिंदू शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली.

25 मे 2022 - काश्मिरी टीव्ही कलाकार अमीरा भट्ट यांची गोळ्या झाडून हत्या.

24 मे 2022- दहशतवाद्यांनी पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्यात सात वर्षांची मुलगी जखमी झाली आहे.

17 मे 2022 - बारामुल्ला येथील एका वाईन शॉपवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकला. या हल्ल्यात रणजित सिंह यांचा मृत्यू झाला. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत.

12 मे 2022 - काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची बडगाममध्ये गोळ्या झाडून हत्या. दहशतवाद्यांनी त्यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार केला.

12 मे 2022- पुलवामा येथे पोलीस शिपाई रियाझ अहमद ठाकोर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

Latur Accident: अंबाजोगाई-लातूर रोडवर भीषण अपघात; चार जण जागीच ठार

Mumbai High Court: मुंबई हायकोर्टाच्या नव्या इमारतीचं सोमवारी भूमीपूजन

वायू प्रदूषण आणि उष्णतेमुळे ब्रेन स्ट्रोकची प्रकरणे वाढली; जगात अशा लोकांची संख्या पोहोचली 1.19 कोटींवर

Maharashtra Rain: 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

IND vs BAN: मोठ्या लक्ष्यासमोर बांगलादेशची दमदार सुरुवात; भारत विजयापासून सहा विकेट्सनी लांब