ताज्या बातम्या

दहा लाखांचे रेडबुल गायब

Published by : Sagar Pradhan

रिध्देश हातिम|मुंबई: आपण अनेक प्रकारचे चोर पाहिले असतील. सायकल चोर, पाकीट चोर, वाहन चोर, मात्र मुंबईच्या बोरवली येथे आगळ्यावेगळ्या चोरीची घटना समोर आली आहे. कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक रेड बुल पेय चोरी करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केलेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवलीतील किर्ती ट्रॅव्हल कंपनीला रेड बुल प्रा.लि. यांच्यामार्फत किंमत 9,57,331/- रू असलेल्या 400 बॉक्स ट्रान्सपोर्ट करण्याची ऑर्डर मिळाली होती. मात्र, चालक याने ते ठरलेल्या ठिकाणी न देता त्यांची स्वतःच्या फायद्यासाठी परस्पर गायब केली.

गुन्ह्या दखल होताच सपोनी ओम तोटावार व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी तात्काळ नमुद गुन्हयाच्या घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केल्यावर आरोपी हा बोरीवली स्टेशन वरून सुरतच्या दिशेने गेल्याचे दिसुन आले. आरोपीताने फिर्यादी यांनी ज्या मोबाईल क्रमांक वरून फोन केला होते. त्याचा सीडीआर काढुन त्याचे अवलोकन केले असता तांत्रिक तपासाच्या आधारे यातील पाहिजे आरोपी हा देवगांव ता. लालगंज जि अजमगढ़ या ठीकाणी गेला असल्याचे दिसुन आले.

सीसीटीव्ही व तंत्रीक तपास यांची सांगड घालुन देवगांव ता लालगंज जि अजमगढ याठिकाणी स्थानिक पोलीस ठाण्याचे पो.ह. विनोद यादव यांच्या मदतीने आरोपीतास जेरबंद करण्यात आले. पोलीस कोठडी दरम्यान तपास केला असता त्यांने त्याचा साथीदार नामे आदित्य निशाद रा. गणपत पाटील नगर, बोरीवली (प) मुंबई याच्याकडे विक्रि करण्यासाठी दिले असल्याची माहिती दिली. त्यांनुसार त्याच्या साथीदार यास देखील गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे. गुन्ह्यातील चोरी गेलेली संपुर्ण मालमत्ता हस्तगत करण्यात आले आहे. अटक आरोपींचे नाव 1)भरत राधेश्याम यादव, 2)आदित्य निशाद यांच्या कडून रेड बुलचे 400 बॉक्स किं. 9,57,331/- रू. असून गुन्ह्यातील शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात कस्तुरबा पोलिसांना यश मिळाले आहे.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा