नवी मुंबईत तब्बल एक कोटींचा गांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी पिकअपमधून आणलेला 414 किलो गांजा जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तळोजा परिसरात कारवाई केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या धडक कारवाईत १ कोटी रूपये किमतीच्या गांजासह वाहन हस्तगत करण्यात आले असून गांजा तस्करीप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.