बॉलिवूड अभिनेता सलमान खानविषयी सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगताना पाहायला मिळत आहेत. सलमान खानचा जवळचा मित्र असलेले राजकारणी बाबा सिद्दीकी यांची सुमारे महिन्याभरापूर्वी हत्या करण्यात आली. त्यानंतर सलमानलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून तो बिश्नोई गँगच्या रडारवर आहे. त्याला सातत्याने जीवे मारण्याची धमकी मिळत आहेत. त्याच्या सुरक्षिततेही वाढ करण्यात आली आहे. अखेर आज सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
थोडक्यात
सलमान खानला धमकी देणाऱ्यास अटक
5 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या इसमास कर्नाटकातून अटक
धमकीचा संदेश देणारा आरोपी सोहेल पाशा वरळी पोलिसांच्या ताब्यात
अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्याऱ्या इसमाला अटक करण्यात आली आहे. ५ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या इसमास कर्नाटक जिल्ह्यातून अटक केली. धमकीचा संदेश देणारा आरोपी सोहेल पाशा (२४) असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. वरळी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाईन व्हॉट्सअॅप क्रमांकावर सलमान खान याला धमकी देण्यात आली होती. वाहतूक शाखेतील सुनीता कदम यांच्या फिर्यादीवरून वरळी पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा नोंदविण्यात आला होता.