Admin
ताज्या बातम्या

अकोल्यात दुर्घटना: मंदिरात आरती सुरू असतानाच 100 वर्ष जुनं झाड कोसळलं, 7 जणांचा मृत्यू

अकोल्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अकोल्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. बाळापूर तालुक्यातील पारस येथील बाबूजी महाराज ही घटना घडली आहे. अकोल्यात जोरदार पाऊस सुरु आहे वादळी वाऱ्यासह हा पाऊस कोसळत आहे. या जोरदार पावसामुळे मंदिरामध्ये आरती सुरू असताना सोसाटाच्या वाऱ्यामुळे 100 वर्ष जुनं झाड अचानक कोसळलं.

या दुर्घटनेत 30 ते 35 जण जखमी झाले आहेत. तसेच 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मंदिरालाच लागून असलेलं 100 वर्ष जुनं लिंबाचं झाड मंदिराच्या टिन शेडवर कोसळलं. अचानक झाड कोसळल्याने संपूर्ण शेड खाली आली आणि त्यात अनेकजण दबले गेले. या सर्वांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले.

रात्रीचा अंधार यामुळे बचावकार्यात अडथळा येत होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाचं एक बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं. यावेळी जेसीबीच्या सहाय्याने मातीचा ढिगारा हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result