जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या काम बंद आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी बेमुदत संपावर आहेत. या संपाचा सामान्य माणसांना त्रास सहन करावा लागतो आहे.
संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर मेस्मानुसार कारवाईला सुरुवात करण्यात आलीय. तर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसाही जारी केल्यात. राज्य सरकारने जुन्या पेन्शन संदर्भात जरी अभ्यास समिती गठित केली असली तरीही समितीच कर्मचारी संघटनांना मान्य नाही त्यामुळे हा संप सुरू राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
संपाचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. राज्यातील अनेक रुग्णालयात रुग्णांचे हाल होत आहेत.