Nupur Sharma  team lokshahi
ताज्या बातम्या

Nupur Sharma : नुपूर शर्मा अन् देशात मोठा सायबर हल्ला

हॅकर्सनी 70 च्या आसपास वेबसाईट्स हॅक केल्या

Published by : Shweta Chavan-Zagade

भाजपची माजी प्रवक्ता नुपूर शर्माच्या (Nupur Sharam) पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त विधानानंतर देशासह विदेशातूनही जोरदार विरोध होताना दिसत आहे. दरम्यान भारतात (India) या प्रकरणामध्ये भारतातल्या अनेक वेबसाईट्सवर आंतरराष्ट्रीय सायबर अटॅक झाले. या हॅकर्सनी भारतातल्या एका प्रमुख बॅंकेला लक्ष्य करण्याता प्रयत्नही केला होता. हॅकर्सनी (Cyber Attack in India) ७० च्या आसपास वेबसाईट्स हॅक केल्या आहेत.

Nana Patole : कॉंग्रेसला बदनाम करण्याचा भाजपचा धंदानिलंबित भाजपा (BJP) नेत्या नुपूर शर्माच्या मोहम्मद पैगंबर यांच्याविषयीच्या टिप्पणीमुळे मोठा वाद उफाळून आला आहे. याचा परिणाम मलेशियातल्या हॅक्टिविस्ट समूह ड्रॅगनफोर्सने केलेल्या या सायबर हल्ल्यांमध्ये ऑनलाइन प्लॅटफॉर्म्ससोबत इस्रायलमधला भारतीय दूतावास, राष्ट्रीय कृषी विस्तार प्रबंधन संस्थान आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या ई-पोर्टलला लक्ष्य केलं आहे.

याशिवाय दिल्ली पब्लिक स्कूल, भवन आणि देशातल्या अनेक मोठ्या समूहांच्या प्रमुख शिक्षण संस्थांवरही हल्ला केला. फक्त महाराष्ट्रातल्या ५० पेक्षा अधिक वेबसाईट्स हॅक करण्यात आल्या आहेत. ऑडिओ क्लिप आणि टेक्स्टच्या माध्यमातून हॅकर्सने एक मेसेज पाठवला आहे. ज्यात त्यांनी सांगितलंय की तुमच्यासाठी तुमचा धर्म आहे आणि माझ्यासाठी माझा धर्म आहे.

नेमकं काय झालं?
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्माने एका टीव्ही डिबेटमध्ये पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली. यानंतर वाद अधिकच वाढला. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा अरब देशांनीही निषेध केला होता. यानंतर भाजपने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले. वाद वाढल्यानंतर नुपूर शर्माने माफीही मागितली होती आणि आपले वक्तव्य मागे घेतले होते.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी