महागाई वाढतच चालली आहे. दिवसेंवदिवस महागाईचा वाढता आलेख पाहता. सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. महाराष्ट्रात ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. उसामुळे राज्यात राज्यात साखर आणि गुळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं.
ऊसाच्या रसावर आता 12 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. हा निर्णय उत्तर प्रदेशात जीएसटी अॅडवान्स रुलिंग ऑथॉरिटीने घेतला आहे. मात्र अजून एक गोष्ट ती म्हणजे जर रस्त्यावरील गाड्यावर किंवा ऊस स्टॉलवर रस घेतला तर त्यासाठी हा GST द्यावा लागणार नाही. तर हाच ऊसाचा रस जीएसटी क्रमांक धारण करणाऱ्या दुकानातून घेतला तर त्याला जीएसटी लागणार.
उत्तर प्रदेशात जीएसटी अॅडवान्स रुलिंग ऑथॉरिटीने सांगितले आहे की, व्यापारी तत्वावर जर ऊसाचा रस विकला जाणार असेल तर त्यावर हा जीएसटी द्यावाच लागेल. अशी त्यांनी माहिती दिली आहे.