North East Express Accident 
ताज्या बातम्या

North East Express Accident : बिहारमध्ये मोठी रल्वे दुर्घटना, नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे रुळावरुन घसरली

North East Express Accident: दिल्लीहून गुवाहाटीला जाणाऱ्या नॉर्थ-इस्ट एक्सप्रेसचे तब्बल 21 डब्बे रुळावरुन घसरले. या भीषण अपघातात आतापर्यंत 4 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Published by : Pankaj Prabhakar Rane

बिहार : बिहारमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बिहारच्या बक्सरमध्ये बुधवारी रात्रीच्या सुमारास रेल्वेचा भीषण अपघात झाला. दिल्लीहून गुवाहाटीला जाणाऱ्या नॉर्थ-इस्ट एक्सप्रेसचे तब्बल 21 डब्बे रुळावरुन घसरले. या भीषण अपघातात आतापर्यंत 4 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर शेकडो प्रवासी जखमी झाले आहेत.

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघाताची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतल

डब्यात अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम रात्री उशीरापर्यंत सुरू होतं. गेल्या सहा महिन्यातील रेल्वे अपघाताची (Train Accident) ही दुसरी घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नॉर्थ-इस्ट एक्सप्रेस राजधानी दिल्लीच्या आनंद विहार स्टेशनवरून गुवाहाटीच्या कामाख्या स्टेशनकडे निघाली होती.

ट्रेन बिहारच्या बक्सर जिल्ह्यात आली असता, दानापूर विभागातील रघुनाथपूर स्टेशनजवळ दोन एसी डब्यांसह 21 डबे रुळावरुन घसरले. या भीषण अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, या दुर्घटनेत आतापर्यंत 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

Nilesh Rane | Kokan Vidhansabha | कोकणात कुणाचं वारं? निलेश राणे Exclusive

Mumbai Vidhansabha Poll | मुंबईकरांचा कौल कोणाला? 'या' नेत्यांना मिळणार पराभवाचा धक्का ?

मणिपूरमध्ये आंदोलनाला आठवडाभर स्थगिती, ‘कोकोमी’चा निर्णय

'त्या' प्रकरणी अजित पवार यांना बारामती कोर्टाचे समन्स

महाराष्ट्रातील 36 जिल्हे, 288 मतदारसंघ, जवळपास 4500 मतमोजणी पथके मतमोजणीसाठी सज्ज