ICF चेन्नईकडून वंदे भारत नव्या स्वरुपात आणण्याची योजना आखण्यात येत आहे.नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेसचा ताशी वेग हा 130 किमी असणार आहे. सध्या वंदे भारत एक्सप्रेसचा वेग हा ताशी 160 किमी इतका आहे.
पहिली नॉन-एसी वंदे भारत ट्रेन ऑक्टोबर महिन्यात सुरु होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.या गाड्यांमध्ये फायर अलार्म सिस्टीम, इमर्जन्सी अलार्म या सुविधा असणार आहे. अगदी वाजवी दरात प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येणार आहे. नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेसची बाह्य रचना ही थोडी वेगळी असणार असल्याची माहिती मिळत आहे.
वेगाने, आरामदायी प्रवाशांना प्रवास करता येण्यासाठी ही नॉन एसी वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात येणार असल्याचं रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.