नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर ट्विट करत निशाणा साधला आहे. नितेश राणे म्हणाले की, मराठी माणसाची घरं लुटल्याने जेलमध्ये जाऊन आलेले आणि सद्या निव्वळ बेलवर बाहेर असलेल्यांनी मराठी माणसावर बोलू नये.
यासोबतच ते म्हणाले की, निव्वळ मुस्लिम मतांवर निवडून आलेल्यांनी तर हे अजिबात सांगू नये. मुंबईत महायुतीला 2 लाख मते अधिक मिळाली आहेत, हे विसरू नका. असे नितेश राणे म्हणाले.