कोकणातील बारसू रिफायनरीवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. आरोप - प्रत्यारोप होत आहेत. उद्धव ठाकरे बारसूमध्ये दाखल झाले असून ते ग्रामस्थांशी चर्चा करत आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले की, शिंदेंची देशात गद्दार म्हणून ओळख. रिफानरीसाठी लोकांची डोकी फोडण्याचा त्यांनी घाट घातला आहे. सरकारने या स्थानिकांशी संवाद साधावा. लोकांना रिफायनरी नको असेल तर रिफायनरी नको करु. लोकांचा विरोध असल्यास रिफायनरी होणार नाही. वाईट प्रकल्प कोकणात नको. असे उद्धव ठाकरे म्हणाले. असे उद्धव ठाकरे म्हणाले.
त्यानंतर नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. नितेश राणे म्हणाले की, आम्हाला माहिती मिळाली आहे की, तेव्हाचे सरकार म्हणून केंद्र सरकारकडे जे पत्र पोहोचवलं होतं त्या एका पत्राची किंमत १०० कोटी होती. ते १०० खोके मातोश्रीकडे पोहोचले पाहिजेत म्हणून पत्र व्यवहार केला होता.
एक पर्यटक मुंबईवरून आला आहे, बारसू गावात हेलिकॉप्टर उतरू दिलं नाही म्हणून जैतापूरमध्ये उभं केलं आहे. बारसू गावात लोकांशी बोलून, पेटवापेटवीचं काम ते करणार आहेत. नेमकं ते इथे पेटवण्याचं काम करण्याची भाषा करत आहेत, ते पेटवा पेटवी करण्यासाठी नाही तर आपल्या घराची चूल पेटली पाहिजे याकरता ते येथे आलेत असे नितेश राणे म्हणाले.