मुंबई : एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी काल औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवला अन् राज्यात एका नव्या वादाला सुरुवात झाली. एका कार्यक्रमासाठी एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) आले होते. त्यांच्या या दौऱ्यामुळे सध्या राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. ओवैसी स्कुल ऑफ एक्सलेंस या शाळेच्या भुमिपुजन कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी ते उपस्थित होते. या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी ते खुलताबाद येथील औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीवर देखील गेले होते. याठिकाणी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीला वंदन करत फूल वाहिली. यावरुन सध्या महाराष्ट्रात राजकारण सुरु आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी याच प्रकरणावरुन आता ओवैसींवर तोफ डागली आहे.
नितेश राणे यांनी अत्यंत आक्रमक होत ओवैसींवर घणाघात केला आहे. "ओवैसी नावाचे दोन हलकट जोपर्यंत ह्या देशात आहेत तोपर्यंत ते हिंदुना डिवचत राहणार. या दोघांना उघडे नागडे फेकले पाहिजे, त्या औरंगजेबच्या ठिकाणी राज्य सरकारने शौचालय उभारून तुम्ही कोणाची अवलाद आहात हे दाखवून द्या." अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे.
दरम्यान, तर मोहित कंबोज यांनी देखील ओवैसींवर निशाणा साधत त्यांच्यावर कारवाई का करत नाही असा सवाल करत महाविकास आघाडीला देखील घेरण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्तीवर येऊन एक कुत्रा औरंगजेबाच्या कबरीवर जातो. जातो तर जातो अन् महाराष्ट्रातील हिंदुंना आव्हान देतो. एरवी हनुमान चालिसा आणि जय श्री राम म्हणणाऱ्यांवरही पोलीस आणि ठाकरे सरकार कारवाई करतं, लोकांना अटक होते. मात्र त्यांच्यावर कुणीही कारवाई करत नाहीये. खुर्चीसाठी तुम्ही विचारसरणी सोडली. भोंग्याचा विषय असेल तर 1000 मशिदींना परवानगी दिल्यावर 20-25 मंदिरांना परवानगी मिळते. ओवैसींवर कारवाई का झाली नाही? पोलीस एवढे लाचार आहेत का? ठाकरे सरकार एवढं लाचार आहे का? जर तुम्ही लाचार असाल तर 15 मिनिटांसाठी पोलीस हटवा, त्यांना हिंदू दोन हात करुन उत्तर देतो असं कंबोज म्हणाले आहेत.